शेतशिवरातील ३३ ड्रम मोह सडवा नष्ट

138

– गडचिरोली पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २९ एप्रिल : तालुक्यातील मुरूमबोडी शेतशीवारात दारू विक्रेत्यांचा 33 ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कार्यवाही गडचिरोली पोलिस व मुक्तीपथने संयुक्तरीत्या केली.
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १६ किमी अंतरावर असलेल्या मुरुमबोडी गावात अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री केली जाते. दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या गावात आंबेशिवणी, आंबेटोला, उसेगाव, अमिरझा, धुंडेशिवणी, कळमटोला, भिकारमौशी, गिलगाव, खुर्सा, कुरखेडा, कुडकवाही या गावातील लोक दारू पिण्यासाठी येतात. सोबतच परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना दारुचा पुरवठा केला जातो. दारू गाळण्यासाठी शेताशिवारात ठिक-ठिकाणी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे लागोपाठ दोन दिवस गडचिरोली पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली असता ३३ ड्रम ६०० किलो मोहफुलाचा सडवा व साहित्य मिळून आला. घटनास्थळी मिळून आलेला जवळपास दीड लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिसांना बघताच दोन दारूविक्रेत्यानी घटनास्थळावरून पळ काढला. ही कार्यवाही पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई नाईक कलाम पठाण यांनी केली. यावेळी मुक्तीपथचे संघटक अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम, स्वीटी आकरे उपस्थित होते.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here