‘सुरजागड’ प्रकल्पाची होणार पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी

1876

– मौखिक किंवा लेखी आक्षेप नोंदविता येणार

The गडविश्व
गडचिरोली, २५ सप्टेंबर : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर सुरु असलेल्या लोहखनीज प्रकल्पाची पर्यावरण विषय जाहीर लोकसुनावणी होणार आहे. ही जाहीर जनसुनावणी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन पद्धतीने वे बॅक्स ॲप द्वारे घेण्यात येणार आहे. या जनसुनावणीत मौखिक किंवा लेखी आक्षेप नोंदविता येणार आहेत.

वने व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांची अधिसूचना १४ सप्टेंबर २००६ व सुधारीत अधिसूचना १ डिसेंबर २००९ अन्वये मे. लॉयड मेटल्स ॲण्ड एनर्जी लि., सुरजागड आयर्न ओर माईन, सुरजागड, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली या कंपनीद्वारे मे. सुरजागड आयन ओर माईन, सुरजागड, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली येथे प्रस्तावित वाढीव उत्पादनाकरिता ३४८.०९ हे, आर खाण लीज क्षेत्रात लोह खनिज उत्खनन ३.० दशलक्ष टन प्रतिवर्ष (ROM) ते १०.० दशलक्ष टन प्रतिवर्ष (ROM) क्षमतेच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत पर्यावरणविषयक जनसुनावणी घेण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज सादर केला आहे.
सदर प्रकल्पामुळे एटापल्ली तालुक्यातील बांडे, मल्लमपड (मत्यगण्ड), नागेर, परसाळगडी, सुरजागड, हेद्री, डकारा खु. (अकेराटोला), करमपल्ली, पेठा (स). आरेगुडा (झारेवाडा), कुदारी (कुद्री), नागुलवाडी (नागुलपाडी), मोहली (मोली) ही गावे प्रभावित होणार असून सदर प्रस्तावित प्रकल्पाची पर्यावरण विषयक जाहिर लोकसुनावणी आयोजीत करण्यात आली आहे.

सदर जाहीर जनसुनावणी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे २७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ : ०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. वे बॅक्स ॲप मिटिंग नंबर 2525 124 7095, पासवर्ड 27102022 असे असून वे बॅक्स मिटिंग लिंक https://mpcb.webex.com/mpcb/j.php?MTID=m894561849ed0c8444e3481253ccae70e हि आहे.
सदर प्रकल्पाबाबत लेखी स्वरूपात विचार, टीका, टिप्पणी जाहीर सुनावणीच्या तारखेपूर्वी प्रादेशिक कार्यालय व उप प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उद्योग भवन, पहिला माल, बस स्टॅन्ड समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर या पत्त्यावर अथवा srochandrapur@mpcb.gov.in या ईमेल वर पाठविण्यात यावा. तसेच सदर प्रकल्पाच्या परिसरामधील रहिवासी, पर्यावरणविषयी काम करणाऱ्या संस्था ,सदर प्रकल्पामुळे अन्यप्रकारे प्रभावित होणारे रहिवासी यांना सदर प्रकल्पासंबंधी विचार, टीका, टिप्पणी तोंडही किंवा लेखी स्वरूपात जाहीर सुनावणी दरम्यान सुद्धा नोंदविता येणार आहे. सदर प्रकल्पाविषयी व पर्यावरण मूल्यांकन अहवालाच्या सारांशाची माहिती असलेले दस्तावेज इंग्रजी व मराठी मध्ये विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध असून संबधीत व्यक्ती त्या कार्यालयामध्ये सदर कागदपत्रे कार्यालयीन वेळेत अभ्यासू शकतील असे उप प्रादेशीक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर तथा समन्वयक पर्यावरण विषयक जनसुनावणी यांनी कळविले आहे.

या कार्यालयत दस्तावेज उपलब्ध

1) क्षे़त्रीय कार्यालय, पश्चिम मध्य झोन, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, न्यु सेक्रेटरिएल बिल्डींग तळमजला, ईस्ट विंग, सिव्हील लाईन, नागपूर.
2) पर्यावरण विभाग, 15 वा मजला, नवीन प्रशासकिय भवन, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई 400032
3) सह संचालक (जल प्रदूषण नियंत्रण), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्पतरु पाईंट, 2 रा व 4 था माळा, सिनेप्लानेट सिनेमा समोर, सायन सर्कल जवळ (पु) मुंबई – 400022
4) प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन, पहिला माळा, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर.
5) उप प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग भवन, पहिला माळा, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपूर.
6) जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली.
8) जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली.
9) उप-विभागीय कार्यालय, एटापल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.
10) नगर पंचायत एटापल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.
11) तहसिल कार्यालय, एटापल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.
12) पंचायत समिती कार्यालय, एटापल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.
13) गट-ग्राम पंचायत कार्यालय, परसाळगोंडी (तालुक्यातील बांडे, मल्लमपड (मत्यमपड), मांगेर, परसाळगोंडी, सुरजागड, हेट्री), ता. एटापल्ली, जि गडचिरोली.
14) गट-ग्राम पंचायत कार्यालय, तोडसा (इकारा खु. (अकेराटोला), करमपल्ली, पेठा (स), झारेगुडा (झारेवाडा )}, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.
15) गट-ग्राम पंचायत कार्यालय, नागुलवाडी (कुदारी (कुद्री), नागुलवाडी (नागुलपाडी), मोहर्ली (मोली)), ता. एटापल्ली, जि. गडचिरोली.

सदर लोकसुनावनीमध्ये कित्तेकजण आक्षेप नोंदवितात, काय निकाल लागतो याकडे मात्र लक्ष लागून आहे.

(#gadchiroli surjaagad etappli aheri, collector office gadchiroli Environmental Information Centre, Maharashtra Pollution Control Board)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here