साधुटोला जंगलपरिसरातील ३५ हजारांचा मुद्देमाल नष्ट

140

– कुरखेडा पोलीस व मुक्तीपथची संयुक्त कारवाई
The गडविश्व
गडचिरोली १८ नोव्हेंबर : साधुटोला जंगलपरिसरातील ३५ हजारांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करीत दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केल्याची कारवाई कुरखेडा पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
साधूटोला येथील जंगलपरिसरात हातभट्टी लावून दारू गाळली जाते व कुरखेडा शहरासह परिसरातील किरकोळ दारू विक्रेत्यांना दारूचा पुरवठाही केला जातो. या जंगलपरिसरात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलीस विभाग व मुक्तीपथच्या तालुका चमूनी संयुक्तरित्या जंगलपरिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान ठिकठिकाणी आढळून आलेले दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले. सोबतच १० मोठे व लहान ५ मडके मोहसडवा, ३ ड्रम मोहसडवा, साहित्य असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांना बघताच एका दारू विक्रेत्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्या आरोपीला पकडून गुन्हा दाखल केला. सदर कारवाई एपीआय दिनेश गावंडे यांच्या नेतृत्वात बिट अंमलदार मधुकर बाळसाकडे, मुक्तीपथ तर्फे मयूर राऊत, विनोद पांडे, कान्होपात्रा राऊत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here