शोधग्राम ‘सर्च’ रुग्णालय येथे ११ रुग्णांवर कान नाक आणि घसा (थायरॉईड व टॉन्सिल) यांसारख्या आजारांवर शस्त्रक्रिया

366

The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील सर्च, शोधग्राम येथील माँ. दंतेश्वरी रुग्णालयात २६ व २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यातून आलेल्या ११ रुग्णावर या शिबिरात शस्त्रक्रिया करण्यात आली.
सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. सर्चमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्यासाठी २६ व २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली. यात कान नाक आणि घसा (थायरॉईड व टॉन्सिल ) यांसारख्या आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शस्त्रक्रियेसाठी स्पेशलिस्ट सर्जन डॉ. अजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प पार पडण्यात आला व तसेच २७ फेब्रुवारी ला डॉ. सौरभ बरडे (भूलतज्ज्ञ) व त्यांची टीम यांनी सीपीआर याबद्दल शोधग्राम मधील कार्यकर्त्यांना व शिबिरातील रूग्णांच्या नातेवाईक यांना समजावून उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
सर्चच्या सह संस्थापक डॉ. राणी बंग व डॉ. अजय देशपांडे तसेच संपूर्ण टीम यांच्या नेतृत्वात सदर शिबीर घेण्यात आले. सर्चच्या वैद्यकीय चमूतील डॉ. दत्ता, डॉ. मयूरी, डॉ. अंकिता, डॉ. आशुतोष, डॉ. देशपांडे, विनोद भांडेकर, दिनेश येगावार व सर्व स्टाफ या शिबिरात सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here