शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आणि मशरुम उत्पादन व उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रम

270

– इच्छुक युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
The गडविश्व
चंद्रपूर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक- युवतींकरीता 26 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत रोज दुपारी 12 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय, त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्यासोबतच मशरुम उत्पादन प्रशिक्षणामध्ये मशरुम उत्पादन उद्योगास असलेला वाव, मशरुम उत्पादन प्रक्रिया, मशरुम पासून विविध उत्पादने तयार करणे, पॅकेजींग, लेबलींग तसेच मशरुम उत्पादनाचे ब्रँडिग, अन्न व सुरक्षा आणि मानके, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणीतील विविध टप्पे, बाजारपेठ पाहणी, विक्री कला व उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज विषयक योजनांची माहिती, कर्जप्रकरण इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर 25 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्र. 9403078773, कार्यक्रम आयोजक मिलींद कुंभारे 9011667717, कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here