शिक्षक देवेंद्र लांजेवार राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

390

The गडविश्व
गडचिरोली : बोधी टी एज्यूकेशन फाउंडेशन व जीवनगौरव सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गडचिरोली जिल्हयातील निमगाव जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक देवेंद्र लांजेवार यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देवेंद्र लांजेवार यांनी कोरोना काळात राबविलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा गौरव करण्यात आला.
देवेंद्र लांजेवार हे धानोरा तालुक्यातील नवोपक्रमशिल शिक्षक असून शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सतत नवनविन उपक्रम राबवित असतात. त्यांचे कोरोना कालावधीतील चालता बोलता शिक्षण, माझा वार माझा उपक्रम, शिक्षक आपल्या दारी, शब्दसंग्रहातून अध्ययन हे उपक्रम मार्गदर्शक ठरले. या सर्व उपक्रमांचे राज्यस्तरावर कौतुक करण्यात आले आहे.
जेष्ठ साहित्यीक बाबा भांड, माजी खासदार, डाॅ.सुनील गायकवाड, जीवन गौरवचे संपादक रामदास वाघमारे, अरूण सुरडकर, सुनील मगरे व इतर मान्यवरांचे हस्ते मराठवाडा महसूल प्रबोधिनी सभागृह औरंगाबाद येथे हे पुरस्कार वितरीत करण्यात आले. राज्यातील ३० सर्वोत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये गडचिरोली जिल्हयातील देवेंद्र लांजेवार हे एकमेव शिक्षक आहेत.
पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी आरवेली, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here