मुलचेरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नगराध्यक्ष घेणार पुढाकार

302

– महिलांना दिली ग्वाही
The गडविश्व
गडचिरोली : मुलचेरा शहरातील वार्डांमध्ये सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार तसेच पोलिस प्रशासन व मुक्तिपथ शहर संघटनेच्या सहकार्याने अवैध दारू हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही मुलचेराचे नगराध्यक्ष विकास नैताम यांनी महिलांना दिली.
नगर पंचायत निवडणुकीत आपण दिलेल्या वचना प्रमाणे मुलचेरा शहरातील काही वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री त्वरित थांबिण्याच्या मागणीसाठी शहरातील महिलांनी नपं नागराध्यक्षांची भेट घेतली व निवेदन सादर केले. यावेळी नगरपंचायतचे उपाध्यक्ष मधुकर वेलादी, बांधकाम सभापती रेखा कुमरे, महिला बालकल्याण उपसभापती सपना मडावी,नगरसेविका सुनीता कुसनाके,नगरसेविका मनीषा गेडाम, नगरसेवक उमेश पेळुकर, नगरसेवक दिलीप आत्राम उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २९ वर्षापासून दारूबंदी आहे. दारूबंदी जनतेच्या हिताची आहे. शहरातील काही वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करून, दारूबंदी अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी नगर पंचायतीतर्फे नगर दारूमुक्तीचा प्रस्ताव पारित करून दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करा. नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक वार्डात दारू व्यसनींच्या उपचारासाठी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करा. निवडून येण्यापूर्वी आपण दिलेला वचननाम्याचे पालन करीत शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य करा, अशी मागणी मुलचेरा शहरातील विविध वार्डातील महिलांनी शहराच्या नगराध्यक्षा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

दिलेल्या वचनाचे पालन करा

एटापल्ली शहरातील अवैध दारूविक्री बंद करून दिलेल्या वचनाचे पालन करण्याची मागणी मुक्तिपथ शहर संघटनेच्या महिलांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन नपं उपाध्यक्षा मीना नागुलवार, नगरसेविका रेखा मोहूर्ले, तारा गावडे, कविता यावलकर, शालिनी कुंभारे, जानोताई गावडे, नगरसेवक जितेंद्र टिकले, राघवेंद्र सुलवावार, राहुल कुळमेथे यांचे प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष दीपयंती पेंदाम यांना सादर करण्यात आले. निवेदन देतांना शहर संघटनेच्या सदस्य गीता मोहूर्ले, योगिता गावतुरे, प्रमोदिनी वन्नमवार, यशोदा गुरनुले, शशिकला वरगंटीवार, शिला गडंमवार, अश्विनी सिडाम, वर्णिला पुल्लूरवार, धनलक्ष्मी पर्वतालवार, जाइबाई मोहूर्ले, गीताबाई मोहूर्ले यांच्यासह शहर संघटनेच्या 45 महिला उपस्थित होत्या. यावेळी तालुका संघटक किशोर मलेवार, रविन्द्र वैरागडे, रूपेश हिवरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here