मिनी मॅरेथॉनस्पर्धेचे मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली द्वारे आयोजन

81

The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑगस्ट : आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली कडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज १४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची मिनी मॅरेथॉन दौड पोटेगाव रोड वर २ कि मी जाणे येणे आयोजित करण्यात आलेली होती. स्पर्धेत १०० पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी भाग घेतला. जिल्हा जलसंधारण अधिकारी पी एम इंगोले यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरवात केली. स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेकरिता आदिवासी वसतिगृह गडचिरोली येथील वॉर्डन काळे, ढवळे, सिंचन विभागाचे दशमुखे, कंत्राटदार राठी, हरडे यांनी सहकार्य केले. पोलीस विभाग तसेच आरोग्य विभाग यांनी सुद्धा सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील कर्मचारी आखाडे, सहारे ,रामगिरीवार यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here