माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिराचे भूमिपूजन

140

– आलापली येथील माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर येथे होणार समाज मंदिर
The गडविश्व
अहेरी, ३ नोव्हेंबर : तालुक्यांतील आलापल्ली येथे माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर मध्ये माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते समाज मंदिराचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले .
समाज मंदिर नसल्याने प्रत्येक वर्गातील समाजबांधवांना अडचण भासत होती. गावात माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर होते मात्र समाज मंदिर नसल्याने वैयक्तिक कार्यक्रम असेल, सण उत्सव असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल पण समाज मंदिर नसल्याने आलापल्ली येतील सर्व समाज बांधवांनी गांवात बैठक घेवून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे माँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर चे पदाधीकारी व प्रतिष्ठित नागरिक यांनी मंदिराच्या बाजूला समाज मंदिर बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली असता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांनी शासनाकडून समाज मंदिर बांधकामासाठी निधी प्राप्त होताच समाज मंदिर देऊ अशी ग्वाही दिले व मजुरी मिळाल्यावर माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते
भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी मॉं वैष्णवी दुर्गा मंदिर आलापल्ली मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मंडळाचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here