बोर्डाच्या परिक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांची थेट सुप्रीम कोर्टात धाव

262

The गडविश्व
मुंबई : बोर्डाच्या परीक्षा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. असे असताना विद्यार्थी ऑफलाईन परिक्षा घेण्याबाबत संमत नाहीत. अजूनही बोर्डाचे विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला या मागणीवर ठाम आहेत. विविध बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीआहे .
SSC,HSC,CBSE,ISCE,NIOS या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. महाराष्ट्र, झारखंड, राजस्थान बोर्डाचे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी आग्रही आहेत. आता या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत हे पाहणे महत्वाचे आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द करा किंवा पुढे ढकला अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे ऑफलाइन परीक्षांऐवजी मुल्यांकनाच्या पर्यायी पद्धतीची मागणी करण्यात आली आहे.
सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य मत याबाबत माहिती दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेसाठी तयार नसून त्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here