बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा : २८ बँकांना २२,८४२ कोटींचा गंडा

474

The गडविश्व
नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात खळबळ उडवून देणारा सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एबीजी शिपयार्ड या कंपनीने देशातील आघाडीच्या २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केली असून सीबीआयने सबळ पुरावे हाती येताच याप्रकरणी कारवाईचे पाऊल उचलले आहे. एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ दरम्यान हा घोटाळा झाला असून कंपनीच्या तत्कालीन तीन संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एबीजी शिपयार्ड ही एबीजी समूहातील प्रमुख कंपनी असून जहाज बांधणी आणि जहाजांची दुरुस्ती यात ही आघाडीची कंपनी मानली जाते. गुजरातमधील सुरत आणि दहेज येथे या कंपनीचे प्लांट असून कंपनीच्या संचालकांनी तब्बल २८ बँकांची फसवणूक केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एबीजी शिपयार्डचे तत्कालीन संचालक ऋषी अग्रवाल, संथनम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल या तिघांसह कंपनीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बँकिंग क्षेत्रातील आजवरचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. एबीजी शिपयार्डने बँकांची तब्बल २२ हजार ८४२ कोटींची फसवणूक केली आहे. ‘ स्टेट बँक ऑफ इंडिया ‘ने केलेल्या तक्रारीनंतर चौकशी केली असता या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here