धनतेरसला रोकडे ज्वेलर्सच्या गडचिरोली शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी; दागिन्यांच्या खरेदीवर भरघोस सवलती
– ११ नोव्हेंबरपर्यंत विशेष ऑफर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : धनतेरस आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने मुल रोडवरील रोकडे ज्वेलर्सच्या गडचिरोली शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आकर्षक दागिन्यांचे विविध कलेक्शन, विशेष सवलती आणि खरेदीसोबत मिळणाऱ्या बक्षिसांच्या संधी यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विदर्भातील १९०२ पासूनची परंपरा असलेल्या रोकडे ज्वेलर्सने यंदा ‘ये है नया रोकडे’ या अभियानांतर्गत ग्राहकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ४० टक्के, १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ६० टक्के, तर डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर १०० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच जुन्या सोन्याच्या एक्स्चेंजवर त्याच्या मूल्याच्या १०१ टक्क्यांपर्यंत लाभ मिळण्याची संधी आहे. सोन्याच्या दागिन्यांचे मेकिंग चार्जेस ५ टक्क्यांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ही विशेष ऑफर ११ नोव्हेंबर २०२६ पर्यंत नियम व अटींसह सुरू राहणार आहे.
शोरूममध्ये २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसह डायमंड व फॅन्सी डायमंड ज्वेलरीचे वैविध्यपूर्ण कलेक्शन उपलब्ध आहे. पारंपरिक दागिन्यांपासून दैनंदिन वापरासाठी हलके आणि आधुनिक डिझाइन, तसेच खास प्रसंगांसाठी आकर्षक डायमंड ज्वेलरीपर्यंत विविध पर्याय ग्राहकांना पाहता येत आहेत. खरेदीसोबत सोने आणि चांदी जिंकण्याच्या संधीमुळेही ग्राहकांचा उत्साह वाढत आहे.
धनतेरसच्या निमित्ताने ग्राहकांना कुटुंबासह निवांत खरेदी करता यावी, यासाठी रोकडे ज्वेलर्सचे सर्व शोरूम सकाळी ८.३० वाजल्यापासून खुले ठेवण्यात आले होते.
रोकडे ज्वेलर्सचे संचालक पारस रोकडे यांनी ग्राहकांच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. १९०२ पासून विदर्भातील ग्राहकांनी दिलेले प्रेम आणि विश्वास हीच आमची मोठी ताकद आहे. प्रत्येक ग्राहकाला त्याच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि बजेटनुसार दर्जेदार दागिने उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. विदर्भातील नागरिकांनी आपल्या परिवारासह शोरूमला भेट देऊन या विशेष ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नागपूरमधील इतवारी सराफा, नवीन इतवारी शोरूम, महाल व लक्ष्मीनगर, कोराडी, हिंगणा रोड यांसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे रोकडे ज्वेलर्सची शोरूम्स ग्राहकांच्या सेवेत आहेत.













