पोलीस भरतीत देण्यात आलेले एन.सी.सी प्रमाणपत्राचे वाढीव ५ टक्के गुण अन्यायकारक

1930

– जिल्हाधिकारी संयज मीणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांचे निवेदन

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १९ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा पोलीस भरती नुकतीच पार पडली असून या भरतीमध्ये २ मार्च २०२० च्या शासन निर्णयाप्रमाणे देण्यात आलेले एन.सी.सी प्रमाणपत्राचे (NCC Certificate Marks) ५ टक्के वाढीव गुण अन्यायकारक असून वाढीव गुण प्रक्रिया तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी पोलीस भरती देण्याऱ्या अन्यायकारक विद्यार्थ्यांनी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना निवेदनातून केली आहे.
राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. अनेक विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करीत आहे. मात्र या दरम्यान काही विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेत २ मार्च २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांना एकुण गुणांच्या ५ टक्के गुण वाढवून देण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे हे इतर विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. एन.सी.सी विद्यार्थ्यांना एकुण जागेच्या ५ टक्के जागा राखीव ठेवणे न्यायपूर्वक व योग्य आहे. परंतु सध्या गुणांच्या ५ टक्के गुण वाढवून देण्याची प्रक्रिया चुकीची व अन्यायकारक आहे. त्यामुळे ही सदर अन्यायकाराक प्रक्रिया तात्काळ बंद करावी व २ मार्च २०२२ अगोदरच्या नियमाप्रमाणे राज्यात पोलीस भरती करण्यात यावी अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली आहे. तसेच निवेदनाची प्रतिलिपी गृहमंत्री, पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना सुद्धा महितोस्तव सादर करण्यात आली आहे.
निवेदन देतांना, साजिद खान पठाण, शुभम चापले, मंगेश सहारे, शरद आलाम, प्रविण गुंफला, दिपक ठाकरे, स्वप्नील कोंडाखुरले तसेच इरत पोलीस भरतील तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here