पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक दिवसीय कार्यशाळा

100

The गडविश्व
गडचिरोली, १६ ऑक्टोबर : पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत काम करणा­या युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी VLE ची एक दिवसीय कार्यशाळा १५ ऑक्टोबर रोजी पार पाडण्यात आली.
सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना ॲप बाबत माहिती देण्यात आली. सदर ॲपच्या माहितीमुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत बँक सेवा, जात प्रमाणपत्र, पीक विमा, पंतप्रधान विमा योजना, ई-श्रम कार्ड, पेंशन सर्विस, इन्शुरंस या सारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होणार आहे. यावेळी माहे- ऑगस्ट व सप्टेंबर २०२२ मधील VLE चे उत्कृष्ट काम करणा­या युवक- युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक 512, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन १६७, प्लंम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल डयुटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२, सेल्समॅन ४ असे एकुण २८६६ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १४० मत्स्यपालन ८७ कुक्कुटपालन ५०४, बदक पालन १००, वराहपालन १०, शेळीपालन ८०, शिवणकला २२२ मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड ५२५ , पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ८८०, टु व्हिलर दुरुस्ती ६४ , फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३०, टु/फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. तसेच कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट मॅनेजर (csc) गडचिरोली, आकाश खोडवे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर (csc) गडचिरोली, विशाल कुंभाळकर हे उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here