दारूविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करणार

133

-रेगडी ग्रापंच्या बैठकीत निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, २० ऑगस्ट : ग्रामपंचायत अंतर्गत गावातील दारूविक्रेत्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही न जुमानता अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ठराव चामोर्शी तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत समितीने घेतला आहे.
रेगडी ग्रापं कार्यालयात आयोजित बैठकीला सरपंच मोहिता लेकामी, अंगणवाडी सेविका रसिका मेश्राम, ग्रापं सदस्य बाजीराव गावडे, तमुस अध्यक्ष देवराव डी.खांडरे, उपसरपंच प्रवीण मोहूर्ले, ग्रापं सदस्या सुरेखा गेडाम, अश्विनी नेवारे, अंगणवाडी सेविका भारती लक्ष्मण कुळमेथे, मेघा वाघमारे, सुरेश रॉय, मुर्लीधर नेवारे, सुरेश गावडे उपस्थित होते.
यावेळी मुक्तीपथ ग्रामपंचायत समितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचे वाचन करण्यात आले व समितीचे पुनर्गठन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सहसचिव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. याप्रसंगी कलम १८८, २७२, २७३, ग्रामपंचायत अधिनियम दारू बंदी कायदा, पेसा कायदा, अल्पवयीन मुलांचा संरक्षण कायदा, साथरोग कायदा, सुगंधित तंबाखू गुटखा बंदी कायदा, अन्न व औषध मानके कायदा इत्यादी कायद्याची अंमलबजावणी करून आपले गाव दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी काय करता येईल व व्यसनापासून कसे दूर राहता येईल, याबाबत मुक्तिपथ तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी समजावून सांगितले. दरम्यान, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी दारूविक्रेत्यांना नोटीस बजावणे व त्यांनंतरही अवैध व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्यांकडून 5 हजाराचा दंड वसूल करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here