तालुका क्लिनिकला ४१ रुग्णांची भेट

184

The गडविश्व
गडचिरोली : देसाईगंज, धानोरा व भामरागड या तालुका मुख्यालयी बुधवारी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ४१ रुगांवर उपचार करण्यात आले.
तालुक्यातील रुग्णांना तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुकास्थळी व्यसन उपचार तालुका क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या संधीच सोन करीत उपचार घेतला आहे. बुधवारी देसाईगंज शहरात आयोजित क्लिनिकमध्ये ६ नवीन व १९ जुने अशा एकूण २५ रुग्णांनी भेट दिली. धानोरा क्लिनिकमध्ये ९ तर भामरागड तालुका क्लिनिकला ७ रुग्णांनी भेट देऊन पूर्ण उपचार घेतला. तिन्ही क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ४१ रुग्णांनी लाभ घेत दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
सोबतच रुग्णांना औषोधोपचार व समुपदेशन सुद्धा करण्यात आले. दारूचे सवय कशी लागते, धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम, शरीरावर काय परिणाम दिसतात आदींची माहिती देण्यात आली. तसेच उपचार घेतलेल्या रुग्णांच्या घरोघरी भेट देऊन दर महिन्याला पाठपुरावा केला जातो. यामुळे वेळोवेळी उपचार व मार्गदर्शन मिळत असल्यामुळे रुग्णांना व्यसनातून बाहेर पडण्यास मदत मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here