जि.प. तील महिला कर्मचारी विनयभंग घटना : जि.प.च्या कर्मचाऱ्यांनी केला निषेध

1523

– मुख्य लेखा तथा वित्त अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, २३ नोव्हेंबर : स्थानिक जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ओकांर अंबपकर याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ जि.प. च्या कर्मचाऱ्यांनी बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी जि.प.च्या आवारात निषेध करीत आरोपीस तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.
जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ओंकार अंबपकर याने महिला कर्मचारीची विविध कामाच्या बहाण्याने विनयभंग केला. याबाबत पीडित कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीस अटक केली. तसेच न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय, काळीमा फासनारा असून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकाराचा निषेध दर्शविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी २३ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात आरोपी मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी ओकांर अंबपकर या विरोधात निषेध करीत विभागीय चौकशी करून तात्काळ निलंबित करावे व कठोर कारवाई  द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वच कर्मचाऱ्यांनी विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करीत निदर्शने केली.

#Zp Gadchiroli #The Gadvishva #Gadchiroli News #Oknkar Ampkar #Crime News #Suspend #

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here