‘जागतीक बांबू दिवस’ साजरा करण्यासंदर्भात वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे कार्यक्रम संपन्न

126

The गडविश्व
गडचिरोली, १९ सप्टेंबर : वनविभागातर्फे येथील वनसंरक्षक कार्यालयातील टिप्पागड सभागृहात रविवार १८ सप्टेंबर रोजी ‘जागतीक बांबू दिवस’ साजरा करण्यासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ट समाजसेवक देवाजी तोफा हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक उप वनसंरक्षक गडचिरोली मिलिश दत्त शर्मा यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात एस.एल.बिलोलीकर यांनी बांबूचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी बांबू दिवस साजरा करण्यात येत असल्याबाबत माहिती देत बांबू हे हिरवे सोने असुन सामाजिक आर्थिक उन्नती करणारे वनोपज असल्याचे नमुद करुन गडचिरोली जिल्हयात असलेले बांबू क्षेत्र महाराष्ट्र बांबू विकास मिशन तर्फे राबविण्यात येणारे बांबू वृक्ष लागवड योजना, राष्ट्रीय बांबू मिशन व अटल बांबू समृध्दी योजना याबाबत विस्तृत माहिती दिली.
पार्डी येथील बांबू लागवड करणारे शेतकरी संजय धनदाटे, हरिदास कुंभारे, चंद्रशेखर मुरतेली यांनी आपले अनुभव कथन करुन बांबू लागवड करणे फायदेशीर असल्याची माहिती दिली. सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक बि.डी. मडावी यांनी शेतकरी उत्पादक कंपनी गठीत करुन बांबू लागवडीचे संबंधीत असलेले प्रयोगाची माहिती दिली. जेष्ट समाजसेवक देवाजी तोफा यांनी शेतकरी व कर्मचारी यांच्यात समन्वय असने आवश्यक असुन बांबू क्षेत्राचे कार्यआयोजना तयार करुन शिस्तबध्द रितीने बांबूचे संरक्षण व संवर्धन केल्यास त्यापासुन चिरकाल उत्पन्न मिळेल असे प्रतीपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. चे अध्यक्ष व माजी आमदार डॉ . नामेदवराव उसेंडी यांनी बांबूच्या झाडाबाबत विस्तृत माहिती देत ते निर्माण करीत असलेले पर्यावरण पुरक बांबू प्रक्रीया केंद्रामुळे तरुणांना रोजगार व शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार असल्याबाबत माहिती दिली तसेच जिद्द चिकाटी व तसी मानसिकता ठेवुन बांबू लागवड प्रकल्प राबविल्यास पर्यावरण पुरक विकासाची संकल्पना साकार करता येईल असे प्रतीपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक श्रीमती स्मिता तातावार यांनी केले तर उपस्थीतांचे आभार सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी मानले. सदर कार्यक्रमात बांबू उत्पादक शेतकरी, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, पेसा, ग्रामसभाचे व वनहक्क समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी गडचिरोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here