गडचिरोली : हाच का तो आरमोरी मार्ग ? राष्ट्रीय महामार्गावरील फलकामुळे प्रवासी बुचकळ्यात

3412

– आरमोरी जाणारे नवखे प्रवासी जातात कोटगल ला
The गडविश्व
गडचिरोली, २५ सप्टेंबर : प्रवास करत असताना रस्त्यांवर लावण्यात आलेले दिशादर्शक फलक तसेच गावाच्या नावाचे फलक प्रवाशांना वाट दाखविण्याचे काम करतात मात्र याला अपवाद गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा न्यायालयानजीकच्या गचिरोली- मूल मार्गावर असेलल्या कोटगल फाट्यावर लावण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील फलकाने चंद्रपूर- मूल मार्गे येणारे नवखे प्रवासी बुचकळ्यात पडत असल्याचे निदर्शनास येत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स परिसरातील जिल्हा न्यायालय-सेमाना बायपास या चौरस्त्याच्या कडेला दिशादर्शक व पुढील गावाची वाट दाखवणारा भला मोठा फलक लावण्यात आला आहे. मात्र सदर फलक प्रवाशांना बुचकळ्यात पाडत असून या फलकावर आरमोरी तसेच धानोरा या तालुका मुख्यालयाचे दिशा व अंतर दर्शविले आहे. त्यानुसार आरमोरी जाण्याकरिता डाव्या बाजूला दिशा निर्देश दिले असल्याने चंद्रपूर- मूल मार्गे येणारे अनेक नवखे प्रवासी कोटगल पर्यंत जाऊन परत आल्याचे कळते. कॉम्प्लेक्स पासून जवळपास ३ ते ४ किमी अंतरावरून शहरातील इंदिरा गांधी चौक येथून डाव्या बाजूस वळल्यास आरमोरीला जाता येतो. मात्र येथे कॉम्प्लेक्स परिसरात न्यायालयानजीक कोटगल कडे जाणाऱ्या मार्गावर फलक लावल्याने अनेकदा नवखे प्रवासी फलक वाचून इथूनच डाव्या बाजूला आरमोरी जाण्यास मार्ग आहे असे समजून कोटगल पर्यंत जातात व तिथे विचारपूर केल्यानंतर चुकीच्या रस्त्याने आले असल्याचे कळल्यावर त्या फलकाविषयी तीव्र संतापही व्यक्त करतांनाचे चित्र आहे.

सदर फलकामुळे नवखे प्रवासी बुचकळ्यात पडत असल्याने या फलकात दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत असून चक्क राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आलेल्या अशाप्रकारच्या फलकाने प्रवाशी बुचकळ्यात पडत असल्याने आणखी किती असे फलक आहेत ज्यामुळे प्रवासी चुकीची वाट धरत आहे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असून फलक सुव्यवस्थित लावण्यात आले आहे काय हे तपासणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच गडचिरोलीतील हे फलक लावण्यात संबंधित विभाग किती तत्परतेने कार्य करत आहे हे दिसून येत आहे. संबंधित विभाग यात काय सुधारणा करते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here