गडचिरोली : सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकने महिलेचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी ट्रकांची केली जाळपोळ

1231

– परिसरात तणावाचे वातावरण, सुरजागडचा वाद पुन्हा चिघळला
The गडविश्व
अहेरी (Aheri) २७ सप्टेंबर : आष्टी – आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर शांतिग्राम नजीक आज २७ सप्टेंबर ला सायंकाळच्या सुमारास सुरजागड लोहप्रकल्पातील लोहखनीज वाहतूक करण्याच्या कामात असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली असता महिलेचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त करत लोहखनिज वाहतूक करणाऱ्या जवळपास ७ ते ८ ट्रक ची जाळपोळ करीत आगीच्या भक्षस्थानी टाकले. बीजोली सुभाष जयदार रा.कांचनपुर असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन खळबळून उठले आहे. जाळपोळ केल्याचे विडिओ समाजमाध्यमांवर वायरल झाले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा सुरजागडचा वाद चिघडल्याचे दिसून येते आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावर लोहखनिज उत्खनन सुरू असून दररोज हजारो टन लोहखनीजाची वाहतूक ट्रक ने केली जात आहे. अशातच अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाला स्थानिकांचा प्रखर विरोध असतांनाही हे प्रकल्प सुरू करून दररोज लोहखनीज वाहतूक केली जात आहे. यामुळे आष्टी-आलापल्ली मार्गाची पूर्णतः चाळण झाली असून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तर धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. तर सदर लोहखनीज वाहतूक करणारे वाहन भरधाव वेगाने जात असल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. हे बघता नागरिकांनी आंदोलन करून दिवसा लोहखनीजाची वाहतूक बंद ठेवण्यात यावी अशी मागणी केली होती तसेच जोपर्यंत रस्त्याची पूर्णतः दुरुस्ती होत नाही तोपर्यंत लोहखनीज वाहतूक करू नये अशी मागणी होती.

मात्र या मागणीला व प्रखर विरोधानंतरही वाहतूक सुरू ठेवली असता आज २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लोहखनीज वाहतुकीत असणाऱ्या ट्रक ने आष्टी-आलापल्ली मार्गावरील शांतीग्राम नजीक दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाले. प्रखर विरोध असतांनाही वाहतूक सुरू ठेवल्याने व अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी ट्रक थांबवून ७ ते ८ ट्रकची जाळपोळ केली. यावेळी चालक पसार झाल्याचे कळते तर ट्रक ला भक्षस्थानी टाकल्याने मोठे मोठे आगीचे लोळे आकाशात जातांना दिसत होते. यावेळी वाहतूकही खंडित झाली होती. जाळपोळीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरलही झाले आहेत. सदर घटनेने पुन्हा एकदा सुरजागडचा वाद चिघळल्याचे दिसून येत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन सदर घटनेने खळबळून उठले आहे.
सुरजागड प्रकल्प सुरू होण्याच्या सुरवातीला अशाप्रकारे अपघात झाल्याने नागरिकांनी ट्रकची जाळपोळ केली होती. त्या घटनेची आता पुन्हा पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत आहे.

तर सुरजागड प्रकल्पाच्या वतीने वाढीव उत्खनाची मागणी मात्र यामुळे एटापल्ली तालुक्यातील अनेक गावे या प्रकल्पाने बाधित होत असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणीचे आयोजन २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे केले आहे. नागरिकांचे काही आक्षेप असल्यास ते नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले असून एटापल्ली तालुक्यात ही सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली असून आज झालेल्या घटनेने सदर लोकसुनावणी दरम्यान पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
आज झालेल्या घटनेने प्रशासन मात्र खळबळुन उठले असून काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

©©©©©

(Gadchiroli, ashti, alapalli, aheri, surjagadh, accident)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here