गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत प्रादेशिक वनविभागामध्ये भारतीय वन सेवेतील तिन नविन अधिकारी रुजू

497

The गडविश्व
गडचिरोली : भारतीय वन सेवेतील अधिकारी यांचे बदली आदेश निर्गमित झालेले असून गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत प्रादेशिक वनविभागामध्ये कार्यरत भारतीय वनसेवेतील अधिकारी यांची प्रशासकीय कारणास्तव ईतरत्र ठिकाणी बदली तसेच त्यांचे ठिकाणी इतर ठिकाणाहून बदलून आलेल्या भारतीय वन सेवेतील अधिकारी यांची बदलीने पदस्थापना झालेली आहे. डॉ. कुमारस्वामी यांना उपवनसंरक्षक (प्रादे) गडचिरोली या पदावर तिन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला असून त्यांची बदली उपवनसंरक्षक (मानव संसाधन व व्यवस्थापन) नागपूर या पदावर झालेली आहे. त्यांचे जागेवर मिलीश दत्त शर्मा यांची पदस्थापना झालेली असून त्यांनी उपवनसंरक्षक (प्रादे) गडचिरोली या पदाचा पदभार ग्रहण केलेला आहे. सदर अधिकारी हे सहा.वनसंरक्षक (तेंदू) मध्य चांदा वनविभाग येथून आलेले आहे.
सुमित कुमार यांना उपवनसंरक्षक (प्रादे) सिरोंचा या पदावर तिन वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला असून त्यांची बदली विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र वन विकास महामंडळ, बल्लारशाह आगार या पदावर झालेली आहे. त्यांचे जागेवर श्रीमती पुनम पाटे या महिला अधिकारी यांची पदस्थापना झालेली असून त्यांनी उपवनसंरक्षक (प्रादे) सिरोंचा या पदाचा पदभार ग्रहण केलेला आहे. सदर अधिकारी हया उप संचालक, नवेगाव नागझीरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली येथुन आलेल्या आहेत. राहुल सिंह टोलिया यांची पदस्थापना उपवनसंरक्षक (प्रादे) आलापल्ली या रिक्त पदावर झालेली असून त्यांनी नियमीत पदभार ग्रहण केलेला आहे. सदर अधिकारी या अगोदर उपविभागीय वन अधिकारी (वन्यजीव) आलापल्ली या पदावर कार्यरत होते. सद्यास्थितीत गडचिरोली वनवृत्ताअंतर्गत प्रादेशिक वनविभागातील उपवनसंरक्षक दर्जाची सर्व पदे भरण्यात आलेली असल्याने विभागातील प्रलंबित कामांचा निपटारा जलदगतीने होण्याची आशा वनसंरक्षक (प्रा) गडचिरोली यांनी व्यक्त केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here