गडचिरोली : जिल्हयातील २ लाख ९३ हजार बालकांना मिळणार जंतनाशक डोस

115

– १० ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहिम
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत १ ते १९ वर्ष वयोगटातील बालकांना परजीवी जंतापासून आजार उदभवण्याचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम १० ऑक्टोबर २०२२ ला जिल्हयात या वर्षातील दुसरी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम व १७ ऑक्टोबर २०२२ ला मॉप अप दिन राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील २ लाख ९३ हजार ९ बालकांना डोस देण्यात येणार आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला माता बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील बेले सुध्दा उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हयात १ ते १९ वर्ष वयोगटातील २,९३,००९ बालक आहेत. या वयोगटातील बालकांना या परजीवी जंतापासून आजार उदभवण्याचा धोका असल्याने दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोट दुखी, भुक मंदावणे, अतिसार, शौच्यामध्ये रक्त पडणे, आतडयावर सुज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यामुळे यावर उपया म्हणून जंतनाशक गोळया वाटप करून मुलांना या समस्यांपासुन दुर करण्यासाठी जंतनाशक दिन मोहीम राबविण्यात येणार आहे.
१ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व  बालकांना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा राष्ट्रीय जंतनाश दिनाचा उद्देश असुन देशभरात एकाचा दिवशी १० ऑक्टोबरला राबविण्यात येणार आहे. या दिवशी कोणी वंचित राहिल्यास १७ ऑक्टोबरला मॉप अप दिनाच्या माध्यमातून गोळया वाटप करण्यात येणार आहे.
या मोहिमेकरिता १ ते १९ या वयोगटातील २ लाख ९३ हजार ९ पात्र लाभार्थी असून १ ते ६ वर्ष वयोगटातील अंगणवाडीतील बालके ८५८४६, ६ ते १० वर्ष वयोगटातील बालके ६७२०९, १० ते १९ वर्ष वयोगटातील बालके १३९९५४ एवढे आहेते. या मोहिमेकरिता नोडल अंगणवाडी-मिनी अंगणवाडी २३७६, नोडल शिक्षक २०५१ (शासकिय/अनुदानित शाळा १८१३, खासगी शाळा २१८, तांत्रिक संस्था २०) आणि आशा १४६५ असे एकुण ५८९२ मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. तसेच जिल्हयात अंगणवाडी- मिनी अंगणवाडी २३७६, शाळा २०५१ असे एकुण ४४२७ बुथ आहेत. जिहयाकरीता ८ लाख ६८ हजार ३३१ गोळया उपलब्घ झाल्या आहेत.
१ ते २ वर्ष वयोगटातील बालकाला अर्धी गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून पाजण्यात येणार आहे, २ ते ३ वर्ष वयोगटातील बालकाला एक गोळी पावडर करून पाण्यात विरघळुन तर ३ ते १९ वयोगटातील बालकांना एक गोळी चावून खाण्यास सांगण्यात येणार आहे.
ही गोळी खाल्ल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम होणार नसून केवळी मळमळ, उलटी, चक्कर येण्याची शक्यता आहे. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. गोळी खाल्ल्या नंतर असा प्रकार घडला तर संबधित अंगणवाडी सेविका, नोडल शिक्षक, अशा हे त्यावर आवश्यक उपाययोजना करतील. ही गोळी खाल्याने कोणतेही वाईट दुष्परिणाम होणार नाही त्यामुळे संबधित बालकांच्या पालकांना घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे सर्वच पालकांनी या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत पुढाकार घेवून आपल्या पाल्यांना गोळी देवून जंतमुक्त करावे असे आवाहनही यावेळी जिल्हा आरोग्य अधिका डॉ. दावल साळवे यांनी केेले आहे. यावेळी हिला माता बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here