गडचिरोली : उद्यापासून नळाच्या पाण्याचा करता येईल वापर

431

– नगर परिषदेचे आवाहन, पाणी नमुने अहवाल आला 
The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक नगर परिषदेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नळाच्या पाईप लाईनमध्ये काही दिवसांपूर्वी मृत शरीर आढळले होते. त्यानंतर पाण्याचे नमुने तपासणी करीता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले होते. तपासाअंती सदर पाणी नमुने पिण्यास योग्य असल्याबाबत अहवाल नगर परिषदेस प्राप्त झाला असून उदया २४ जून पासून नळ धारकांनी पाण्याचा वापर करावा असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी वाघ यांनी केले आहे.
नगर परिषदेच्या वतीने पुरवठा करण्यात येणाऱ्या चामोर्शी मार्गावरील पाईप लाईन मध्ये मृतदेह आढळला होता. या घटनेनंतर परिसरातील जलकुंभ स्वच्छ करण्यात आले होते मात्र तरी सुध्दा नळाव्दारे मासाचे तुकडे आढळले होते. सदर बाब लक्षात घेता नागरिकांना काही दिवस पाण्याचा वापर न करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
चामोर्शी मार्गावरील ३०० एम.एस.सी आय.पाईप लाईन गोकुल नगरमध्ये जाणारी २५० एम.एस.सी आय.पाईप लाईन इतर डिस्टीब्युशन पाईप लाईन साफ करण्यात आली असून विर बाबुराव शेडमाके चौक, गोकुळ नगर, चनकाई नगर, आशिर्वाद नगर, गणेश नगर व इतत परिसरातील घरगुती नळाचे पाणी नमुणे तपासणी तपासणी करीता जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले होते. तपासाअंती सदर पाणी नमुणे पिण्यास योग्य असल्याबाबत अहवाल नगर परिषदेस प्राप्त झाला असून उदया २४ जून पासून नळ धारकांनी पाण्याचा वापर करावा असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी वाघ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here