उद्या देसाईगंज येथे संत निरंकारी मंडळाद्वारे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

246

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : संत निरंकारी मंडळ देसाईगंज शाखेद्वारे उद्या शुक्रवार २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०९.०० ते दु. ०३.०० वाजतापर्यत देसाईगंज (वडसा) येथील आरमोरी रोड वरील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यांत आले आहे.
सदगुरू माता सुदिक्षा जी महाराज यांचे प्रेरणेने जिल्ह्यातील सर्व साधारण गोर गरीब रुग्णांना रक्त टंचाई होऊ नये म्हणून जिल्हा रक्त पेढी, जिल्हा रूग्णालय, गडचिरोली यांच्या विनंती नुसार संत निरंकारी मंडळा द्वारे जिल्हयात विविध ठिकाणी स्थानीय शाखे द्वारे रक्तदान शिबीराचे आयोजन करून मानव सेवेचे कार्य केले जाते. देशात तसेच जिल्हयात रक्तदान करण्यांत संत निरंकारी मंडळ अग्रस्थानी आहे.
मागील चार वर्षात कोविड महामारी च्या काळातही मंडळाद्वारे प्रशासनाचे विनंती वरून देसाईगंज येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजन करून अनुक्रमे 160, 130, 170 व 254 युनीट रक्त शासकीय जिल्हा रुग्णालयाला पुरवठा केला होता.
या वर्षी ही देसाईगंज (वडसा) येथील रक्तदान शिबीरात परिसरातील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. जवळपास 250-300 महीला-पुरूष रक्तदान करतील अशी अपेक्षा संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी व्यक्त केली आहे.
जनजागृती साठी बुधवार २४ एप्रिल ला संत निरंकारी सेवादल द्वारे जनजागृती रैली संपूर्ण शहर परिसरात काढण्यांत आली होती. त्यात जवळपास 100 महिला-पुरुष सेवादल यांनी गणवेशात भाग घेतला.
सर्व मानवप्रेमी जनतेनी रक्तदान शिबीरात भाग घेवून रक्तदानाचे महान कार्य करावे अशी विनंती संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी केली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #obc #desaiganj #blooddonatcamp #santnirankari #A grand blood donation camp will be organized tomorrow at Desaiganj by Sant Nirankari Mandal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here