गडचिरोलीच्या ‘उत्तर-दक्षिणेस’ रानटी हत्तीचा धुमाकूळ ; आणखी एकाचा घेतला बळी

1458

The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : जिल्ह्यातील ‘उत्तर-दक्षिणेस’ रानटी हत्तींचा उपद्रव सुरूच असून जिल्ह्याच्या दक्षिणेतील भामरागड तालुक्यातील कियर जंगलात रानटी हत्तीने आणखी एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना आज गुरुवार २५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे.
गोंगलू रामा तेलामी (वय ४६) रा. कियर ता. भामरागड असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगणात प्रवेश केला होता. दरम्यान तेलंगणात उपद्रव माजवत दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला होता. त्यानंतर हत्तीने यूटर्न मारत पुन्हा गडचिरोली जिल्यात प्रवेश केला. २४ एप्रिल ला रात्रीपासून भामरागड तालुक्यातील कियर जंगल परिसरात वावरत होता. कियर येथील शेतकरी गोगलु तेलामी हे जंगलालगत असलेल्या शेतात काम करीत असताना अचानक रानटी हत्तीने त्यांच्यावर हल्ला चढवत सोंडेने उचलून जमिनीवर आपटले व पायाखाली तुडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. मृतक गोगलु तेलामी यांचे शरीर छिन्नविच्छिन्न झाले होते. घटनेची माहिती मिळतास वनअधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेने2 परिसरात भीतीचे वातावरण असून हत्तीचा बंदोबस्त2 करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तर आता गडचिरोली जिल्ह्याच्या ‘उत्तर-दक्षिणेस’ रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरू असून उत्तरेतील गडचिरोली तालुक्यातील पोर्ला, आंबेशिवणी या परिसरात रानटी हत्तींचा कळप ठाण मांडून आहे तर दक्षिणेतील भामरागड, अहेरी तालुक्यात एकच रानटी हत्ती असून तो धुमाकूळ माजवत आहे. यापूर्वीही रानटी हत्तीच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेला आहे. वनविभाग मात्र रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यास सपशेल फेल ठरत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #elephanatattack #bhamragadh #’North-South’ of Gadchiroli Wild Elephant Roar; Another one was killed)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here