केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह

187

– याआधी सप्टेंबर 2020 मध्ये सुद्धा कोरोनाच्या पहिल्या लाटेत झाली होती कोरोनाची लागन
The गडविश्व
मुंबई :  देशभरात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडाला आहे. सर्वसामान्यापाठोपाठ राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. दीड वर्षात गडकरींना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची मालिका सुरू झाली आहे. दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सुद्धा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खुद्द नितीन गडकरी यांनी ट्वीट करून माहिती दिली.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य स्वरुपाची लक्षण मला जाणवत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत: ला होम आयसोलेट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही गडकरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here