अहेरी नगर पंचायतीवर आविस व शिवसेनेची सत्ता स्थापन

787

– नगराध्यक्षपदीआविसचे रोजा करपेत तर उपाध्यक्षपदी शैलेश पटवर्धन
The गडविश्व
अहेरी : बहुचर्चित अहेरी नगर पंचायत मध्ये काल नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडूनक पार पाडली. आदिवासी विद्यार्थी संघ, शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून बंडखोरी करूनआविस मध्ये प्रवेश केल्याने अहेरी राजनगरीत दोन्ही राजेंना धक्का देण्यात आले.
अहेरी नगर पंचायत मध्ये १७ प्रभाग असुन बहुमताकरीता नऊ नगरसेवक आवश्यक असतात अहेरीत भारतीय जनता पार्टीचे ६, आविसचे ५, राष्ट्रवादीचे ३ अपक्ष २ असे संख्याबळ होते मात्र बहुमत कुणालाच नव्हता त्यामुळे अहेरी नगर पंचायतमध्ये सत्ता कुणाची बसणार हे गुलदस्त्यातच होते.
मात्र अहेरी नगर पंचायत मध्ये आदिवासी विद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रियाज शेख, बंडखोर नेते शैलेश पटवर्धन यांच्या नेत्रुत्वात सत्ता स्थापन करण्यात आली.
अहेरी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष म्हणून आविसचे रोजा करपेत ह्या १० मतांनी विजयी झाल्या तर उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीतून बंडखोर करून आविस मध्ये प्रवेश केलेले शैलेश पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सर्वाचे लक्ष लागलेली अहेरी राज नगरीत नगर पंचायत आविस-शिवसेना व शैलेशभाऊ यांच्या कब्ज्यात आले असुन अहेरी विधान सभेचे आमदार धर्मरावबाबा आत्राम व माजी राज्यमंत्री अंब्रीशराव आत्राम यांना आविस व शिवसेनेनी जोर का झटका दिला आहे.
निवडूनक पार पाडल्यानंतर अहेरी येथील संपूर्ण प्रभागात विजयी रैली काढण्यात आले. व त्यानंतर अहेरी येथील मुख्य चौकात आभार प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. त्यावेळी मतदारांना संबोधित करतांना आविसचे विदर्भ नेते व माजी आमदार दिपकदादा आत्राम.व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दोन्ही राजेच्या विरोधात मतदारांनी दिलेला कौल व सत्तर वर्षापासून असलेली राजेशाहीला धक्का दिला असुन अहेरी नगर पंचायत अंतर्गत असलेल्या सर्वच प्रभागातील नाली,रोड,विद्युत समस्या असतील व जनसामन्यांचे समस्या असतील ते सोडवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जाईल असे बोलत अहेरीकरांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या मतदान करून विजयी केल्याबद्दल अहेरीकराच्या आभार मानण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक विलास गलबले, सुरेखा गोडसेलवार, मीना ओंडर, महेश बाकेवार, विलास सिडाम, जोतीताई सड़मेक होते तसेच अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके, उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार, पं.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम, आविस शहराध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच विजय कुसनाके, माजी सरपंच गुलाब सोयाम, नितीन पटवर्धन, अपराजित उमेदवार साईनाथ ओैतकर, राजकुमार गुरनुले, विमल सिडाम, माया येलुरकर, सरिता कांडुरवार, आसमा शेख, विजसलक्ष्मी कामीडवार,आविस कार्यकर्ते जगनाथ मडावी, श्रीनिवास राऊत, ईरशाद शेख, आरफज शेख, प्रकाश दुर्गे, नरेंद्र गर्गम विनोद रामटेके, जुलेख शेख, कार्तीक तोगम, मिलींद अलोने, शाम ओंडरे,सल्लमभाई, लक्ष्मण आत्राम व शिवसेना व शैलेशभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here