अवैध दारूविक्री विरोधात ३१६ स्पर्धक एकवटले

99

– दुर्गम भागातील नऊ गावात मुक्तीपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, ११ नोव्हेंबर : अहेरी तालुक्यातील नऊ गावांमध्ये गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून विविध गावातील महिला, पुरुष, युवक, युवती अशा एकूण ३१६ स्पर्धकांनी अवैध दारूविक्री विरोधात एकी दाखवली
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात तानबोडी येथील स्पर्धेत पुरुष -१२, युवक -९, महिला -१८, युवती ९ असे एकूण ४८, बुरुकमालमपल्ली येथे पुरुष -१३, युवक -२०, महिला -९, युवती – १५ एकूण ५७ , किष्टपुर पुरुष -७, युवक -८, महिला -८, युवती – ८ एकूण ३१, मद्दीगुडम पुरुष -४, युवक -७, महिला -९, युवती – ५ एकूण २५, येंकापल्ली पुरुष -४, युवक -७, महिला -१२, युवती – १० एकूण ३३, रामय्यापेठा पुरुष -८, युवक -८, महिला -९, युवती – ७ एकूण ३२, व्येंकटरावपेठा पुरुष -१०, युवक -४, महिला -१०, युवती – ९ एकूण ३३, कन्नेपल्ली पुरुष -७, युवक -५, महिला -७, युवती – ७ एकूण २६ , संड्रा पुरुष -६, युवक -९, महिला -१०, युवती – ६ एकूण ३१ अशा नऊ गावातील ३१६ स्पर्धकांनी मुक्तीपथ मॅरेथॉन दौड स्पर्धेत सहभाग दर्शविला.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. ही स्पर्धा महिला, पुरुष, युवक ,युवती अशा चार गटात घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. चारही गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांनतर बैठकीचे आयोजन करून गावातील लोकांना दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी व स्वप्नील बावणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here