स्वप्नील मडावी सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

366

The गडविश्व
गडचिरोली : येथील इंदिरानगर येथील स्वप्नील मडावी सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक स्वप्नील मडावी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनके विद्याथी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्वप्नील मडावी सर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्वप्नील मडावी सर यांचे पोलीस भरती सर्व प्रश्नसंचावर ३० टक्के सूट देण्यात आली होती. याचा लाभ पोलीस भरतीचा सराव, करण्याऱ्या अनके विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच या प्रश्नसंचाला अनेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक स्वप्नील मडावी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here