– सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला फटकारले :
The गडविश्व
नवी दिल्ली, २८ जुलै : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रमात बदलाचा अधिकार नाही, असे फटकारले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत, असे स्पष्ट झाले आहे
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या जागांवरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे म्हटले आहे. ३६७ स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमात कुठलाही बदल करण्याचा अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही फक्त तारखा बदलू शकता, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ३६७ स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. तसेच नियम मोडल्यास अवमानाची नोटीस बजावली जाईल असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.