सीईटी २०२२ ची परीक्षा पुढे ढकलली 

465

–  उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती 
The गडविश्व 
मुंबई : सीईटी २०२२ ची  परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे अशी माहिती  उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. जीईई (GEE) आणि नीटच्या (Neet) परीक्षांमुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
तंत्र शिक्षण विभागाकडून होणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे आयोजन हे  ३ ते १० जून दरम्यान करण्यात आले होते. मात्र जीईई (GEE) आणि नीटच्या (NEET) प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटीचे आयोजन हे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहेत. त्यामुळे सीईटीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच लवकरच वेळापत्रक जाहीर करु, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत  यांनी दिली.
दरम्यान काही दिवसांआधी जीईई च्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जीईई परीक्षेच्या कालावधीदरम्यानच नीटच्या परीक्षा होत्या. त्यामुळे अभ्यासासाठी आणि विविध कारणांमुळे सीईटीची परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी जोर धरली होती.  उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने या मागणीची दखल घेतली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here