– उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून अखेरची मुदतवाढ
The गडविश्व
नवी दिल्ली : सीईटी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उच्च तंत्रशिक्षण विभागाकडून अखेरची मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ४ ते ११ मे दरम्यान परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
सीईटी परीक्षेच्या तारखा पुढे गेल्यानंतर आणि त्या तारखा जाहीर केल्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षाकरिता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून कार्यालयाकडून ४ ते ११ मे दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवाढ ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी देण्यात येणार नाही आहे.
या सीईटी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ
एमएचटी- सीईटी-२०२२
एमबीए/ एमएमएस सीईटी २०२२
एमसीए सीईटी २०२२
एम.आर्च सीईटी २०२२
एम.एचएमसीटी २०२१
या संदर्भात तंत्रशिक्षण विभागाकडून एक परीपत्रक काढण्यात आले आहे.