– जवानांच्या वाहनाला केले टार्गेट, जवान ट्रक जात असताना झाला स्फोट
The गडविश्व
बिजापूर, दि. २३ : नक्षल्यांनी आयईडी स्फोट घडवून सीआरपीएफ जवानांचा ट्रक उडविल्याची घटना छत्तीसगडच्या सुकमा आणि विजापूर सीमेवर रविवारी घडली. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडच्या जगरगुंडा भागात असलेल्या सिल्जर कॅम्पमधून २०१ कोब्रा कॉर्प्सच्या सैनिकांची हालचाल आरओपी (रोड ओपनिंग ड्यूटी) दरम्यान ट्रक आणि बाइकने टेकलगुडेमकडे रविवारी दुपारी निघाली होती. ट्रकमध्ये शिधा घेऊन जवान शिबिरात जात होते, दरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी वाटेत पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या स्फोटात ट्रकचालक जवान विष्णू आर आणि सहचालक जवान शैलेंद्र हे शहीद झाले. उर्वरित सैनिक सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
टेकलगुडम आणि त्यापुढील भाग हा नक्षल कमांडर हिडमा आणि देवा यांचा बालेकिल्ला आहे. काही महिन्यांपूर्वीच येथे सुरक्षा दलांची कॅम्प स्थापन करण्यात आली होते.

(#thegdv #thegadvishva #cgnews #naxal #crimenews #iedblast #sukma #bijapur )
https://x.com/ani_digital/status/1804869662045253706?t=359RSdzW7q2YEG6wA5jHUA&s=19