सावली : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

430

THE गडविश्व
प्रतिनिधि / गेवरा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सावली तालुक्यातील वनविकास महामंडळ पाथरी अंतर्गत येत असलेल्या जनकापूर रिठ येथील गुराखी विनोद नामदेव ठाकरे (४८) वर्ष हे आज सकाळच्या सुमारास गावातील गुरे चराई करण्याकरिता जंगलात गेले असता. कान्हाळगाव रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने गुराखी विनोद ठाकरे यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. सदर घटना जनकापूर रिठ गावालगत असलेल्या जंगलात घटना घडली.
मृत व्यक्तीच्या कुटुंबात २ मुले, पत्नी आणि सासू असा आप्त परिवार आहे. घरची परिस्थिती बिकट असून मोलमजुरी करून कसे बसे कुटुंब चालवायचे परंतु घरचा कमावताच व्यक्ती गेल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळाली असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here