सावली : म्हशीच्या प्रसंगावधाने वाचले मालकाचे प्राण

359

– तालुक्यातील कोंडेखल जंगल परिसरातील घटना

The गडविश्व
सावली : मानव व वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढतच असल्याने नेहमीच होणाऱ्या या घटनेवरुन दिसुन येत आहे. अशीच एक घटना काल बुधवारी दुपारी 1: 30 ते 2.00 वाजताच्या सुमारास कोंडेखल गावालगत असलेल्या जंगल भागात घडली. एका शेतकऱ्यांसमोर तीन वाघ उभे राहिले लगेच प्रसंगावधान राखून शेतकरी झाडावर चढला.
सावली तालुक्यातील कोंडेखल येथील शेतकरी,लंंकेश अंबादास भोयर हे आपले जनावरे घेऊन नवतळा जंगल परिसरात असलेल्या स्वतःच्या शेतात चराईसाठी गेला. जनावरे चराई करत असताना बर्‍याच वेळाने तीन वाघ समोर येऊन उभे राहिले प्रसंगावधान राखून त्याने लगत असलेल्या झाडावर चढला त्यानंतर एका म्हशीने आक्रमकता दाखवत एका वाघाचा एक किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला तो पट्टेदार वाघ पळून गेला. नंतर दोन वाघ झाडाखाली बसून होते सोबत असलेले बैल सैरावैरा पळाले दरम्यान म्हैस येऊन त्या दोन्ही वाघान कडे बघत राहिली व वाघ म्हशीकडे बघत होते. तो पर्यंत शेतमालक झाडावर चढून हे दृश्य पाहत होता. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मालकाने गावातील नागरिकांना फोन केला.गावातील 30 ते 40 नागरिकांनी लगेच शेताकडे धाव घेतली.तो पर्यंत वाघ झाडाखाली बसून होता. गावकऱ्यांचा आवाज ऐकू येताच दोन्ही वाघ जंगलाच्या दिशेने पळाले. नशीब बलवत्तर होते म्हणून त्या युवा शेतमालकाचे प्राण वाचले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या इसमाला ग्रामस्थांनी खाली उतरवल्यानंतर वन समितीच्या अध्यक्षांनी वनविभागाला या बाबत माहिती देत बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here