सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली मार्फत एक विद्यार्थी एक झाड संकल्पना

210

The गडविश्व
गडचिरोली २ जुलै : सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली मार्फत एक विद्यार्थी आज २ जुलै रोजी एक झाड संकल्पना राबविण्यात आली.
१५ जून ते ३० सप्टेंबर हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्ष लागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याचे काम शासनाच्या वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत नियमित केल्या जात आहे. स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव व वनमहोत्सव कालावधीचे औचित्य साधून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरोली तसेच नवयुग विद्यालय गुरवळा (राखी) या राष्ट्रीय हरित सेना शाळेच्या माध्यमातून गुरवळा (राखी) या गावांत शाळेतील इयत्ता आठवी ते दहावी चे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सामाजिक वनीकरण गडचिरोली परिक्षेत्रातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या मार्फतीने वृक्षदिंडी व वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वृक्षदिंडीच्या माध्यमातून गावात वन व पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली, तसेच शाळेच्या परिसरात वृक्षांची लागवड विद्यार्थ्यांच्या मार्फतीने करुन घेवून शासनाचा एक विद्यार्थी एक झाड हि संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात आली.
सदर कार्यकमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून गुरवळा ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक संरपचा सौ. दर्शना भोपये ह्यांची प्रमुख उपिस्थती होती.
शालेय परिसरात वृक्ष लागवड केल्यानंतर वृक्षांचे संरक्षण व संगोपनाबाबत विद्यार्थ्यांकडून वृक्ष प्रतिज्ञा वाचून घेण्यात आली व त्यांनतर शाळेचे मुख्याध्यापक एम. एस. कवठे, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडचिरेाली मधील धिरज ढेंबरे तसेच कु. शितल बा. खुळसंगे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वन व पर्यावरणाचे महत्व व त्याची जोपासना याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता शाळेतील विद्यार्थी, शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी, परिक्षेत्रातील क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here