The गडविश्व
गडचिरोली २ जुलै : स्थानिक गोकुल नगर येथील सम्मेक बौद्ध विहारात दाहावी बारावीच्या गुनवंत विद्यार्थ्यांचा संयुक्त सत्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तुलाराम राऊत हे होते.तर मान्यवर सि.पि.शेंडे, रोहीदास राऊत, प्रा.प्रकाश दुधे, प्रा.दिलीप बारसागडे, प्रा.गौतम डांगे, अंबादे बाळकृष्ण बांबोंडे, लहुजी रामटेके, अमरकुमार खंडारे, भास्कर इंगळे, सुरेखा ताई बारसागडे, सुमित्रा राऊत, वाडके हे प्रामुख्याने हजर होते.
यावेळी वर्ग दहावीचा प्रतीकधुर्वे, मयुर ठाकरे, आभा खोब्रागडे, प्रिन्सं ऊदीरवाडे, तनमय तोटपल्लिवार,अक्षय भैसारे, सम्यक झाडे, धम्मयानी रामटेके, कृतिका टेकरे, इयत्ता बारावीचे शाम झंझाळ (जिल्ह्यात प्रथम) जयदेव सोरते, संस्कृती कोचे, श्रेया भानारकर, प्रज्वल टेभुर्ने, अभय खोब्रागडे, ज्ञानेश उबंरे, सेजल गोडबोले या गुणवंत विद्यार्थ्यांना पुस्तके व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.गौतम डांगे यांनी केले तर अध्यक्षीय भाषण तुलाराम राऊत यांनी केले. अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.