साखरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध स्पर्धा घेऊन उत्साहात साजरी

326

The गडविश्व
सावली : रयतेचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयती साखरी येथील जि.प.उच्च प्राथ.शाळा व ग्रामपंचायतमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्याचे स्वागत करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून मार्गदर्शन करण्यात आले आणि स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धा घेऊन सर्व स्पर्धकांना प्रमुख पाहुण्याचे हस्ते बक्षीस देण्यात आले.
या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक शेजल भोयर, द्वितीय क्रमांक श्रद्धा भुरसे,तर तृतीय क्रमांक अनामिका झबाडे, वकृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक गीत गेडाम, द्वितीय क्रमांक चक्रविर चौधरी, तर तृतीय क्रमांक शेजल भोयर तर वेशभूषा स्पर्धेत अन्विती घोंगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच ईश्वरजी गेडाम, उपाध्यक्ष उपसरपंच दादाजी पाटील किनेकर, प्रमुख पाहुणे म्हणून शा.व्य.स अध्यक्ष महादेव मडावी, वासुदेव गेडाम, ग्रा.प.सदस्य रवी गेडाम,आशिष पाटील भांडेकर, घनश्याम बोरेवार, धर्मराव बावणे, मनोज झबाडे, देवाजी बावणे, अंकुश भांडेकर, विजय घोंगे मुख्याध्यापक, शिक्षक वामन चौधरी, शिक्षक कामिडवार, शिक्षक संजय ताडाम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ताडाम सर, प्रास्ताविक विजय घोंगे सर यांनी केले तर आभार विवेक कामिडवार सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here