शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा २०२२

202

– परीक्षार्थींना अर्ज करण्याचे आवाहन
The गडविश्व
चंद्रपूर : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी.ॲन्ड ए. बोर्ड) कडून घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा दि. 27 ते 29 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी दि. 10 फेब्रुवारी ते 20 मार्च 2022 पर्यंत असून बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरावयाची मुदत दि. 23 मार्च 2022 पर्यंत आहे. परीक्षार्थीकडून ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार असून ऑनलाइन अर्जाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
परीक्षार्थींना https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतःचा युजर आयडी व पासवर्ड तयार करून ऑनलाइन अर्ज करता येईल. परीक्षेकरिता लागणारी अहर्ता, आवश्यक कागदपत्रे, अनुभव, परीक्षा शुल्क, परीक्षेचे नियम व अटी, अभ्यासक्रम व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसूचना https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर महत्त्वाच्या दुवे मधील जीडीसी अँड ए. मंडळ येथे उपलब्ध आहे. तरी, परीक्षार्थींनी विहीत कालावधीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रशांत धोटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here