विहीरगाव व खरपुंडी येथे शिबीर : ३० रुग्णांवर उपचार

133

The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील विहीरगाव व खरपुंडी येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार गाव पातळी एक दिवशीय व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामाध्यमातून एकूण ३० रुग्णांवर उपचार करण्यात आले.
दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना गावातच उपचार मिळणे सोयीस्कर व्हावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील गावांमध्ये व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या शिबिरांचा लाभ घेतला आहे. विहीरगाव येथे नुकतेच शिबीर पार पडले असून १५ रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णांना अरुण भोसले यांनी समुपदेशन केले. संयोजक छत्रपती घवघवे यांनी केस हिष्ट्री घेतली. या शिबिराचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केले असून यशस्वीतेसाठी रामदास कोहळे, भालचंद्र वैरागडे, हीवराज गोमस्कर यांनी सहकार्य केले.
खरपुंडी येथे सुद्धा गावकऱ्यांच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला १५ रुग्णांनी भेट देऊन उपचार घेतला व दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे. समुपदेशक अरुण भोसले यांनी रुग्णांना धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले., प्रमोद कोटांगले यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत उपचार घेण्यासाठी इतर रुग्णांना प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. या शिबिराचे नियोजन तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. यशस्वीतेसाठी पोलिस पाटील सुधाकर मेश्राम, ग्रापं सदस्य वामन टिकले यांनी सहकार्य केले. या दोन्ही शिबिराच्या माध्यमातून एकूण ३० रुग्णांवर उपचार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here