विपीन पालीवाल यांनी स्वीकारला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार

183

THE गडविश्व
चंद्रपूर :  शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून विपीन पालीवाल (मुद्दा) यांच्या नियुक्तीचे आदेश काल सोमवार   ३ जानेवारी रोजी  नगर विकास मंत्रालयाने जारी केले. आज ४  जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३६ नुसार आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका या पदावर विपिन पालीवाल ( मुद्दा) (मुख्याधिकारी गट-अ निवड श्रेणी) यांची प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.  विपीन पालीवाल (मुद्दा) हे २३ जून २०२१  पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत कामठी, बल्लारपूर आणि वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून काम केले आहे.
आज ४  जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयुक्त कक्षात पदभार स्वीकारला. यावेळी उपायुक्त अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त विद्या पाटील यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्व विभाग प्रमुखांनी  विपीन पालीवाल यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here