विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर

251

-राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारचा प्रस्ताव नाकारला
The गडविश्व
मुंबई : राज्य सरकारच्या प्रस्तावाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक लांबणीवर पडली आहे. राज्यपालकांकडून महाविकास आघाडीला सहकार्य मिळत नसल्याने महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी गेल्या आठवड्यात तीन वेळा भेट घेतली होती. मात्र, राज्यपालांनी पुन्हा एकदा आघाडीचा प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळ राज्यपाल आणि सरकारमधील संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक घेण्यासाठी सरकारकडून राज्यपालांना प्रस्ताव पाठवला होता. मात्र, राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष पद निवडणुकीचा हा प्रस्ताव नाकारला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाच प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने विधान सभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करू शकत नाही, असे राज्यपाल यांनी स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
राज्यपाल मंजुरी देत नाही तोपर्यंत विधान सभा अध्यक्ष निवडणूक होऊ शकत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. विधान सभा अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री आज विधिमंडळात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्री अशोक चव्हाण, नाना पटोले आणि काँग्रेसचे आमदार भेटायला गेले. त्या भेटीत विधानसभा अध्यक्ष निवडणूक व्हावी, ही मागणी काँग्रेस आमदारांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून तीन वेळा शिष्टमंडळ भेटले. निवडणूक प्रस्ताव दिला पण राज्यपालांनी मंजुरी दिली नसल्याचे स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here