वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार : मूल तालुक्यातील मारोडा येथील घटना

561

– परिसरात वाघाची दहशत शेतकरी भयभीत
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा येथील शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना काळ ३० एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. गजानन गुरनूले (६०) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गजानन गुरनुले हे गावालगत असलेल्या शेत शिवारात बैल चारावयास गेले परंतु सायंकाळ होऊनही बैल घरी परत आले परंतु गजानन है परत न आल्याने त्यांचा शोधा शोध घेतला असता रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास त्यांची टोपी आढळून आली तर काही अंतर समोर गेले असता गजानन यांचे मृतक शरीर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून मर्ग दाखल केला आहे. सदर घटनेमुळे गाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here