– dptc मार्फत ५ टक्के निधी हा शाळेच्या मूलभूत सोयींसाठी ठेवण्यात येणार
The गडविश्व
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भावाने शाळा आणि शालेय शिक्षणाला मोठा फटका बसला. तसेच यादरम्यान संपूर्ण शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्यामुळे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा संपर्क कमी झाला होता. शालेय शिक्षण विभागालाही शालेय शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पावले उचलता येत नव्हती. मात्र आता शालेय शिक्षण विभागाकडून काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शालेय शिक्षण शिक्षण आणखी उत्तम व्हावे या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.
राज्य सरकारकडून यंदा पहिल्यांदा dptc मार्फत 5% निधी हा शाळेच्या मूलभूत सोयींसाठी ठेवण्यात आला आहे अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकार फक्त मुलांच्या भौतिक सुविधांवरच लक्ष देत आहे असें नाही तर बोर्डानुसार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर काम सुरु आहे असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
यंदा निजामकालीन शाळांसाठी एकूण १६० कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तर आदर्श शाळांसाठी या वर्षी ५४ कोटी तर पुढल्या वर्षी ३०० कोटी ठेवण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात e-लायब्ररी आणि अभ्यासिका तयार करण्यात येणार आहेत अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. तसेच टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची आहे हे कोरोनामुळे समजले आहे त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांसाठी कॉम्पुटर आणि लँग्वेज लॅबची सोय करण्यात येणार आहे असेही शिक्षणमंत्री म्हणाल्या.
शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी शालेय शिक्षकांना फिनलँड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
#mahabudget2022 pic.twitter.com/pRbNlKn5bM
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 21, 2022