राजाराम येथे ग्रामीण व्हॉलिबाल स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

309

– पं.स सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
The गडविश्व
अहेरी : राजाराम येथे आदर्श क्लबच्या वतीने ग्रामीण व्हॉलिबाल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी आमदार दीपक दादा आत्राम तर दुसरा पारितोषिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व तिसरा पारितोषिक पं.स.सभापती भास्कर तलांडे व पेरमिलीचे माजी सरपंच प्रमोद आत्राम यांच्यातर्फे देण्यात आले आहे.
आज सदर स्पर्धेचा शेवटचा सामना झाला. यात कोटापली संघाने प्रथम व आदर्श मंडळ राजाराम संघाने द्वितीय संघ विजेता ठरला. सदर स्पर्धेचे आज बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते प्रथम बक्षीस तर द्वितीय बक्षिस राजाराम ग्रामपंचायतचे सरपंच नागेश कन्नाके यांच्या हस्ते तर तृतीय बक्षीस अँड.हणमंत आकदर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम चे माजी सरपंच संजय पोरटेत, नारायण चालूरकर, नामदेव पेंदाम, चंदूरशाही आलाम, पत्रकार रोशन कंबोगोनीवार, मंडळाचे अध्यक्ष वसंत सडमेक आदि मान्यवंर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक सुरेसचंद्र जुमनाके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here