वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे मागितली इच्छा मरणाची परवानगी

190

The गडविश्व
सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इच्छा मरणाला परवानगी द्यावी, अशी विनंती राष्ट्रपतींकडे केली आहे. ग्लोकल मेडिकल कॉलेजची मान्यता रद्द झाल्यामुळे वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, मात्र आजतागायत या महाविद्यालयाला मान्यता (Grant) मिळालेली नाही. कुठूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन शहर दंडाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देत इच्छा मरणाला परवानगी देण्याची मागणी केली. मान्यता नसताना अंधारात ठेवून लाखो रुपयांची फी वसूल केली असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.
या निवेदनात, 2016 मध्ये ग्लोकल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. आम्ही सातत्याने तीन ते चार वर्ष एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास सुरू ठेवला. दोन वर्षं शिक्षण घेतल्यानंतर तीन महिन्यांतच आम्हाला डिस्चार्ज मिळाल्याचे समजले. परंतु, याबाबत कॉलेज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही माहिती न देता, आमच्याकडून फी वसूल केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु, तिथे देखील त्यांना न्याय मिळाला नाही. ग्लोकल मेडिकल कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे 30 ते 35 लाख रुपये खर्च झाले आहेत. यापुढे खर्च करण्याची आमची स्थिती नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here