– वनविभागाने गावागावात लावले फलक
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याची दहशत वाढलेली आहे. गावातील परिसरातील नागरीकांना या बिबट्याचे आणि वाघाचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने गावागावात फलक लावले आहे.
रांगी परिसरातील बोरी, निमगाव, रांगी, बेलगाव, मोहटोला, मासरगाटा या गावामध्ये बिबट्या वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. मागिल पंधरा दिवसात बेलगाव येथील बैल मारले, तसेच रांगी नागरिकांना निमगाव फाट्यावर आणि जंगल परिसरात बिबट्याच्या दर्शनाने चांगली दहशत निर्माण झालेली आहे. रांगी ते निमगाव व रांगी ते मौशिखांब- गडचिरोली मार्गांनी येणार्या जाणाऱ्या नागरिकांच्या मनात भीती संचारली आहे. परिसरात आढळणाऱ्या वाघ व बिबट्याचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.