गडचिरोली : ३ जहाल नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

6945

– शासनाने जाहीर केले होते एकुण १० लाख रूपयांचे बक्षीस
The गडविश्व
गडचिरोली, २८ ऑगस्ट : उपविभाग भामरागड अंतर्गत येणा­ऱ्या पोमके लाहेरी हद्दीतील कोयार जंगल परीसरात गोपनिय माहीतीच्या आधारे विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना २ जहाल नक्षलींना अटक तसेच उपविभाग हेडरी अंतर्गत पोमके गट्टा (जां) हद्दीतील झारेवाडा जंगल परीसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना ०१ जहाल नक्षलीस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना आज २८ ऑगस्ट रोजी यश प्राप्त झाले आहे.
सदर नक्षल्याना दोन वेगवेगळया घटनांमध्ये अटक करण्यात आले असुन, कोयार जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलीमध्ये रमेश पल्लो (२९) वर्ष रा. कोयार ता. भामरागड, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी (२३) रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली यांचा समावेश असुन, झारेवाडा जंगल परीसरामध्ये अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे (२७) रा. झारेवाडा ता. एटापल्ली याचा समावेश आहे.

रमेश पल्लो हा सन २०१९ मध्ये भरती होवुन कंपनी १० चा अँक्शन टिम मेंबर व स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. सद्या सन २०२१-२२ मध्ये तो स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता. त्याच्यावर०३ खुन,०८ चकमक, ०१ जाळपोळ, ०१ इतर अशा एकुण १३ गुन्ह्रामध्ये समावेश आहे.
तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी ही सन जुलै २०१५ मध्ये नक्षलमध्ये भरती झाली. सन २०१६ ते २०१९ पर्यंत ती प्लाटुन क्र ७ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती, सन २०१९ ते आतापर्यंत ती कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती, तिच्यावर ०४ खून व ०३ चकमक अशा एकुण ०७ गुन्ह्रामध्ये समावेश आहे..
अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे हा सन २०१० साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन २०१३ पर्यंत कार्यरत होता. सन २०१३ पासुन प्लॉटुन क्र. १४ मध्ये कार्यरत होता. ऑगस्ट २०१३ मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन २०१८ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता. मे २०१८ पासुन ते आजपर्यत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर ७ खुन, ९ चकमक, २ जाळपोळ, २ दरोडा, ०१ जबरी चोरी व इतर ०३ अशा एकुण २४ गुन्हयामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने रमेश पल्लो याचेवर ४ लाख रूपये, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हीचेवर ४ लाख रूपये तर अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याचेवर ०२ लाख रूपये बक्षीस जाहीर होते.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन २०२१-२२ या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकुण ५७ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा.यांचे नेतृत्वात पार पडली.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here