– २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले
The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : रक्त संकलण अधिकारी डॉ. किशोर ताराम यांच्या वाढदिवसानिमित्त काल २३ सप्टेंबर रोजी स्वयं रक्तदाता जिल्हा समिती द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन आरमोरी येथे करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २६ रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. किशोर ताराम, सौ. सरिता ताराम, प्रफुल खापरे, डॉ. के टी. किरणापुरे, सौ. संगीताताई रेवतकर, सौ. ज्योतिताई खेवले उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात, नवनाथ जांबुळे, देवेंद्र प्रधान, रोहित कांबळे, कालिदास मेश्राम, कुणाल भरणे, योगेश देविकार, भूषण किरमे, अविनाश देशमुख, ब्रिजलाल मुंगीकोल्हे, योगेश देशमुख, शुभम खोडवे, होमकांत राऊत, संदीप निपाणे, अतुल चोपकर, धनराज गरमळे कोरवते, अमित कांबळे, निखिल कुथे, देवेंद्र कुथे, रुपम घोडाम यांनी रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिर उप-जिल्हा रुग्णालय आरमोरी येथील डॉ. कोरेटी, डॉ. भावे, परिसेविका माया पारधी सिस्टर, निकेसर सिस्टर, तुप्पट सिस्टर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी जिल्हा रक्तपेढी गडचिरोलीचे समता खोब्रागडे, प्रफुल राऊत, स्वप्निल चापले सर, देशमुख, नान्हे, रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकची जबाबदारी स्वयं रक्तदाता जिल्हा समिती अध्यक्ष चारुदत्त राऊत तसेच सहकाऱ्यांनी पार पाडली.