The गडविश्व
नवी दिल्ली : आयपीएलमधील दहा संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएलच्या या हंगामात लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवे संघाचा समावेश झाल्याने मेगा ऑक्शन असणार आहे. आयपीएल 2022 मध्ये होणाऱ्या लिलावासाठी 1,214 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. यामध्ये 896 भारतीय आणि 318 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 1214 खेळाडूंमध्ये 270 खेळाडूंनी राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधित्व केले आणि 103 खेळाडू अनकॅप आहेत. तर, 41 खेळाडू कॅप खेळाडू आहेत. पण यंदाच्या आयपीएलमधून अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले नाव माघारी घेतले आहे.
वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू ख्रिस गेल याने वय वाढल्यामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. गेल्या हंगामात ख्रिस गेलने पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या हंगामात गेल खेळताना दिसणार नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्ट्सनुसार जो रुट, ख्रिस गेल, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, सॅम करन, मिचेल स्टार्क आणि ख्रिस वोक्स या स्टार खेळाडूंनी आयपीएलच्या लिलावातून आपले नाव माघार घेतले आहे.